Ladki Bahin Yojana : लाडकी बहीणमधील पीएम किसान, शेतकरी महासन्मानच्या लाभार्थी महिलांना 1500 की 500 रुपये मिळणार काय होणार? GR काय सांगतो?

Ladki Bahin Yojana Letest Update 2025

Ladki Bahin Yojana Letest Update 2025 : सर्वांना नमस्कार, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची स्क्रूटिनी सुरु करण्यात आली आहे. यातून अपात्र महिलांना वगळलं जाणार आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या वेळी महायुती सरकारने आणलेली लाडकी बहीण योजना चांगलीच चर्चेत राहिली. महिलांना दरमहा १५०० रुपये देणारी ही योजना आहे. ही योजना बंद होणार नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. तसंच या योजनेमुळे सरकारी तिजोरीवर किती भार पडला आहे हेदेखील स्पष्ट केलं. तसंच ज्या अपात्र महिलांनी निधी घेतला आहे त्याबाबतही महत्त्वाचं विधान देवेंद्र फडणवीस यांनी केलं.

 मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांच्या यादीची स्क्रूटिनी महिला व बाल विकास विभागाकडून केली जात आहे. डिसेंबरच्या तुलनेत जानेवारी महिन्यात लाभार्थी महिलांची संख्या 5 लाखांनी घटली आहे. लाडकी  बहीण योजनेच्या निकषांची पूर्तता न करणाऱ्या 5 लाख लाडक्या बहिणींची नावं  कमी झाली आहेत. 

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना, नमो शेतकरी महिला सन्मान योजनेच्या महिला लाभार्थ्यांना लाडकी बहीण योजनेतून किती रक्कम मिळेलं यासंदर्भात योजनेच्या शासन निर्णयात स्पष्टपणे भाष्य केलं आहे.

🌐 ही बातमी पण वाचा :- Ladki Bahin Yojana : लाडक्या बहि‍णींचे इन्कम टॅक्सचे रेकॉर्ड तपासणार; लाखो बहिणी योजनेसाठी अपात्र ठरणार, आत्ताच पहा..,

पीएम किसान, नमो शेतकरीच्या लाभार्थी महिलांना किती पैसे? 

28 जून 2024 च्या शासन निर्णयानुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेद्वारे एका महिन्यात 1500 रुपयांप्रमाणं एका वर्षात 18000 रुपये पाठवण्यात येणार आहेत. त्यापैकी 7 हप्त्यांचे 10500 लाडक्या बहिणींना मिळाले आहेत. योजनेतील नियमाप्रमाणं पीएम किसान आणि नमो शेतकरी महासन्मान योजनेच्या माध्यमातून प्रत्येकी 6000 रुपयांप्रमाणं पात्र शेतकरी महिलांना 12 हजार रुपयांची रक्कम मिळते.

त्यामुळं थेट आर्थिक लाभाची रक्कम दरमहा 1 हजार रुपये होते. त्यामुळं महिला शेतकऱ्यांना उर्वरित रक्कम दिली जाईल. म्हणजेच एखादी महिला शेतकरी आहे, तिला पीएम किसान सन्मान योजनेतून 6 हजार रुपये मिळतात. नमो शेतकरी महासन्मान मधून 6 हजार मिळतात, अशा वेळी संबंधित महिलेला दरमहा 1500 रुपयांऐवजी 500 रुपये मिळतील. 

🌐 ही बातमी देखील वाचा :- Ladki Bahin Yojana News : लाडक्या बहिणी होणार अपात्र; हे 5 निकष चेक केले जाणार, इथे आत्ताच वाचा नाहीतर..,

लाडकी बहीणच्या अर्जांची स्क्रूटिनी सुरु

महिला व बाल विकास विभागाकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवली जाते. डिसेंबर महिन्यात 2 कोटी 46 लाख महिलांना योजनेचा लाभ देण्यात आला होता. जानेवारी महिन्यात  2 कोटी 41 लाख महिलांना लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये देण्यात आले आहेत. महिला व बालविकास विभागाकडून गेल्या दोन आठवड्यांपासून स्क्रूटिनी सुरु करण्यात आली आहे. या स्क्रूटिनीसाठी परिवहन विभाग, कृषी विभागाची मदत घेण्यात येत आहे. याशिवाय आयकर विभागाची देखील मदत घेतली जाणार आहे. 

अपात्र लाडक्या बहिणींचा लाभ थांबवणार, पैसे परत घेतले  जाणार नाहीत 

महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अपात्र लाडक्या बहिणींकडून पैसे परत घेतले जाणार नाहीत, असं सांगितलं आहे. ज्या लाडक्या बहिणी निकषात बसणार नाहीत त्यांचा लाभ मात्र स्थगित केला जाईल. 

लाडकी बहीण योजनेबाबत काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
लाडकी बहीण योजना सुरु केल्यानंतर ४० ते ४५ हजार कोटींचा भार बजेटवर आल्याने फिस्कल स्पेस कमी झाली आहे. मात्र लाडकी बहीण योजना बंद करणार, ही योजना बंद करणार, ती योजना बंद करणार आम्ही कुठलीही योजना बंद केलेली नाही. ज्या योजना सुरु आहेत त्या चालवणारच आहोत. मी हेदेखील अधिकाऱ्यांना सांगितलं की रिव्हर्स गणित मांडा की आपली प्रगती करण्यासाठी किती गुंतवणूक करायची आहे? किती करु शकतो? २५ हजार कोटींचा फरक पडत असेल तर ते आपण केंद्राकडून विविध योजनांमधून आणता येईल का? याचा विचार आम्ही करतो आहोत. इतर कुठल्या योजनांच्या माध्यमांतून निधी उभा राहिल हे आम्ही पाहतो आहोत. महसुली तूट वाढते आहे म्हणून भांडवली खर्च कमी करायचा या ट्रॅपमध्ये आम्हाला जायचं नाही असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

आता लाभार्थी महिला किंवा तिच्या कुटुंबीयांच्या

नावावर चारचाकी असल्यास त्यांचा लाभ बंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे. यासाठी अंगणवाडी सेविकांची मदत घेतली जात आहे; मात्र, थेट घरोघरी जाऊन पडताळणी करण्याचे प्रशासनाकडून टाळले जात आहे. कारण, ज्या नावांची यादी प्रशासनाला राज्याकडून प्राप्त झाली आहे त्यांच्या नावे चारचाकी वाहन असल्याचे जवळपास निश्‍चित झाले आहे.

त्यामध्ये केवळ अंगणवाडी सेविकांकडून त्यांच्या कार्यक्षेत्रातील लाभार्थ्यांची नावे कळवून खातरजमा करून घेतली जात आहे. त्यामुळे आता हे जवळपास निश्चित झाले आहे की, किमान शासनाकडून जिल्हा प्रशासनाला आलेल्या यादीतील नावे अपात्र करण्याची प्रक्रिया प्रशासनाच्या पातळीवर सुरू केली आहे; मात्र ती यादी अजून तालुकापातळीवर एकात्मिक बालविकास केंद्राकडे प्राप्त झालेली नाही.

अपात्र लाडक्या बहिणींची संख्या :

संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी असलेल्या महिला – 2.3 लाख
वय वर्षे 65 पेक्षा जास्त असलेल्या महिला – 1.10 लाख
कुटुंबातील सदस्यांच्या नावे चारचाकी गाडी असलेल्या, नमोशक्ती योजनेच्या लाभार्थी असलेल्या,स्वेच्छेने योजनेतून नाव मागे घेणाऱ्या महिला – 1.6 लाख
एकूण अपात्र महिला – 5 लाख  

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top