Minister Aditi Tatkare’s Statement : राज्य सरकारद्वारे लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांची पडताळणी सुरू आहे. या पडताळणीत आतापर्यंत ५ लाख महिलांना अपात्र ठरवण्यात आलं आहे. त्यामुळे या अपात्र महिलांचे पुढं काय होणार? या महिलांवर कारवाई होणार? की या महिलांकडून पैसे परत घेतले जाणार? याची चर्चा महिलांसमध्ये सुरु आहे. दरम्यान, यासंदर्भात आता महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
आदिती तटकरे यांनी एक्स या समाज माध्यमावर पोस्ट करत यासंदर्भात माहिती आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा दिलेला लाभ परत घेतला जाणार नाही. तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांना जानेवारी महिन्यापासून सन्मान निधी वितरित केला जाणार नाही, असं त्यांनी सांगितलं.
ही माहिती पण वाचा :- मोठी बातमी! लाडक्या बहिणींना ‘या’ दिवशी मिळणार फेब्रुवारीचा लाभ; अजित पवारांनी केलं मोठं वक्तव्य; निकषांच्या पडताळणीअंती आणखी कमी होणार लाभार्थी..,
पुढे बोलताना, कल्याणकारी राज्याची संकल्पना पुढे नेत असताना लाभार्थ्यांच्या खात्यात यापूर्वी जमा करण्यात आलेला सन्मान निधी परत घेणे उचित ठरणार नाही. म्हणूनच कोणत्याही लाभार्थ्यांच्या बँक खात्यातून आतापर्यंत (जुलै २०२४ ते डिसेंबर २०२४) देण्यात आलेली लाभाची रक्कम परत घेतली जाणार नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
लाडकी बहीण योजना कोणत्या महिलांना ठरवलंय अपात्र?
Ladki Bahin Yojana दरम्यान, आतापर्यंत पाच लाख महिलांना या योजनेंतर्गत अपात्र ठरवण्यात आलं आहे. यामध्ये संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी असलेल्या महिलांची संख्या २ लाख ३० हजार आहे. तर वय वर्षे ६५ पेक्षा जास्त असलेल्या महिलांची संख्या १ लाख १० हजार आहे. तसेच कुटुंबातील सदस्यांच्या नावे चारचाकी गाडी असलेल्या, नमोशक्ती योजनेच्या लाभार्थी असलेल्या आणि स्वेच्छेने योजनेतून नाव मागे घेणाऱ्या महिलांची संख्या १ लाख ६० हजार आहे, अशा एकूण पाच लाख महिलांना अपात्र ठरवण्यात आलं आहे.
महत्त्वाचे म्हणजे ११ लाख महिलांची पडताळणी अद्यापही बाकी आहे. त्यामुळे ही संख्या वाढण्याची शक्यता आहे. सरकारने ही योजना जाहीर केली, त्यावेळी २ कोटी ६३ लाख लाडक्या बहिणींनी नोंदणी केली होती. त्यापैकी २ कोटी ४१ लाख महिला पात्र ठरवण्यात आलं होतं. अशातच आता पाच लाख महिलांना अपात्र ठरवण्यात आलं आहे.
लाडक्या बहीण योजनेची पडताळणी
महिला व बालकल्याण विभाग आणि जिल्हा प्रशासनाने पडताळणीसाठी व्यापक तयारी सुरू आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या पातळीवर लाभार्थ्यांची यादी वर्गीकृत केली जात आहे. यानुसार, बाल विकास प्रकल्प अधिकारी (सीडीपीओ), पर्यवेक्षिका आणि अंगणवाडी सेविका घरोघर जाऊन प्रत्यक्ष चौकशी करत आहेत. या चौकशीदरम्यान लाभार्थ्यांच्या आर्थिक स्थितीची आणि चारचाकी वाहनांच्या मालकीची तपासणी केली जात आहे.
Ladki Bahin Yojana 5 Nikash Konte ?
1) चार चाकी गाडी असेल तर लाभ मिळणार नाही जर महिलेच्या नावावर गाडी असेल किंवा पतीच्या नावावर गाडी असेल तर लाभ मिळणार नाही. (ट्रॅक्टर वगळून)
2) उत्पन्न 2.5 लाख पेक्षा जास्त आहे का? किंवा त्याच्यात आता वाढ झाली तर income tax विभागाकडे माहिती मागून त्याची पडताळणी केली जाईल. जर उत्पन्नात वाढ झाली असेल तर त्या महिला अपात्र होतील.
तुम्ही रेशन कार्ड, उत्पन्न दाखला, किंवा स्वयघोषणा पत्र अपलोड केलं असेल तरी हा नियम सर्वांसाठी सारखा असेल. त्यामुळे वेळोवेळी सर्वांची पडताळणी होईल.
3) लाडकी बहिण योजना सोडून जर महिलेला इतर शासनाच्या योजनेचा लाभ मिळत आहे का? तर लाभ मिळत असेल आणि तो 1500 पेक्षा जास्त असेल. ते लक्षात आल्यावर या पुढे त्या महिलांना लाडकी बहिण योजनेचा लाभ मिळणार नाही. पण समजा जर 1000 रू त्या योजनेचा लाभ मिळत असत तर लाडकी बहिणींचे 500 रुपये दिले जातील.
(जर PM kisan किंवा नमो शेतकरी योजना 6000+6000= 12000 मिळत असतील तर लाडकी बहिणींचे 500 रू मिळतील पण याचा शासनाने अधिकृत GR काढलेला नाही GR आल्यावर तेही व्हिडिओ च्या माध्यमाने कळवण्यात येईल)
4) सरकारी नोकरी असेल, किंवा टॅक्स भरत असतील तर लाभ मिळणार नाही
5) महाराष्ट्रातील महिला पर राज्यात लग्न करून गेली असेल. तर त्यांना लाभ मिळणार नाही. किंवा परराज्यातील महिला महाराष्ट्रात लग्न करून आली तर त्यांना पतीचे कागदपत्रे सदर करावे लागेल. त्या महिलांना लाभ मिळेल.
🔴 मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी :- येथे क्लिक करा.