Mazi Kanya Bhagyashree Yojana 2025 : महाराष्ट्र सरकारने मुलींसाठी खास माझी कन्या भाग्यश्री योजना राबवली आहे. या योजनेत मुलींना जन्मानंतर ५०,००० रुपये मिळतात. तुम्हाला देखील या योजनेचा लाभ हवा असेल तर खाली दिलेली माहिती काळजीपूर्वक व शेवटपर्यंत नक्की वाचा..,
केंद्र सरकारने मुलींसाठी अनेक योजना राबवल्या आहेत. केंद्र सरकारसोबतच महाराष्ट्र सरकारने मुलींच्या शिक्षणासाठी योजना राबवली आहे. महाराष्ट्र शासनाने मुलींसाठी माझी कन्या भाग्यश्री योजना राबवली आहे. या योजनेत मुलींच्या जन्मानंतर पैसे मिळणार आहे.
माझी कन्या भाग्यश्री योजनेत मुलींच्या जन्मानंतर त्यांना ५०,००० रुपये दिले जातात. पालकांना हे पैसे दिले जातात. मुलींचा जन्मदर वाढावा तसेच त्यांना उत्तम शिक्षण मिळावे, या उद्देशातून ही योजना सुरु करण्यात आली आहे. मुलीचा जन्म झाल्यापासून ते ती १८ वर्षांची होईपर्यंत हे पैसे दिले जातात.
गरीब कुटुंबातील मुलींना चांगले शिक्षण मिळावे,या उद्देशातून राबवण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत माझी कन्या भाग्यश्री योजना राबवली आहे. या योजनेत अर्ज करणारी मुलगी महाराष्ट्राची रहिवासी असावी.
माझी कन्या भाग्यश्री योजनेत मुलगी आणि आईच्या नावाने जॉइंट अकाउंट उघडले जाते.या योजनेत १ लाखांचा अपघात विमा दिला जातो. त्याचसोबत ५००० रुपयांचा ओव्हरड्राफ्ट असतो.
माझी कन्या भाग्यश्री योजनेत एका कुटुंबातील फक्त दोन मुली अर्ज करु शकतात. या योजनेचा लाभ घेण्यासाठी मुलींच्या आईवडिलांना कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करावी लागते. त्यानंतर दोन्ही मुलींच्या नावावर २५०००-२५००० रुपये दिले जातात.
या योजनेत पिवळ्या व केशरी रेशनधारकांना लाभ मिळतो. मुलीच्या जन्मानंतर पाच हजार रुपये दिले जातात. मुलगी पहिलीत गेल्यावर ६ हजार रुपये आणि मुलगी सहावीत गेल्यावर सात हजार रुपये तर मुलगी अकरावीत गेल्यावर ८००० रुपये दिले जातात. त्यानंतर मुलगी १८ वर्षांची झाल्यानंतर तिला ७५००० रुपये दिले जातात. याचाच अर्थ असा की तुमची मुलगी १८ वर्षांची होईपर्यंत मुलीच्या नावावर १ लाख १ हजार रुपये जमा झालेले असतात.
माझी कन्या भाग्यश्री योजनेचा अधिकृत सुधारित शासन निर्णय (GR) पाहण्यासाठी :- येथे क्लिक करा
माझी कन्या भाग्यश्री योजनेसाठी लागणारी कागदपत्रे
सरकारी योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड असणे आवश्यक आहे. यासोबतच आई किंवा मुलाचे बँक खाते पासबुक, मोबाईल क्रमांक, पासपोर्ट आकाराचे छायाचित्र, रहिवासी निवासी पत्त्याचा पुरावा असावा. यासोबतच उत्पन्नाचा दाखलाही आवश्यक आहे.
माझी कन्या भाग्यश्री योजनेसाठी अर्ज कसा करावा?
या योजनेसाठी अर्ज करणे खूप सोपं आहे. यामध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागणार नाही. माझी कन्या भाग्यश्री योजनेत नोंदणी करण्यासाठी, तुम्हाला महाराष्ट्र सरकारच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल. यानंतर फॉर्म डाउनलोड करावा लागेल. तो काळजीपूर्वक वाचून भरावा लागेल. जर काही चूक झाली तर तुमचा अर्ज रद्द होऊ शकतो. फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला सर्व कागदपत्रे महिला आणि बाल विकास मंत्रालयाकडे जमा करावी लागतील.
माझी कन्या भाग्यश्री योजनेचा अधिकृत सुधारित शासन निर्णय (GR) पाहण्यासाठी :- येथे क्लिक करा
माझी कन्या भाग्यश्री योजनेतील नियम आणि अटी
मुलीचे आईवडिल महाराष्ट्रातील असावेत
- सरकारी योजना सर्व गटातील दारिद्र्य रेषेखालील तसेच दारिद्र रेषेवरील एपीएल पांढरे रेशन कार्डधारक दोन मुलींना लागू असेल.
- विम्याचा लाभ घेताना मुलीचे वय 18 वर्ष पूर्ण आवश्यक आहे. तसेच दहावी उत्तीर्ण होणे व 18 वर्ष पूर्ण होईपर्यंत अविवाहित आवश्यक
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करताना मुलगी जन्म नोंदणी प्रमाणपत्र आवश्यक आहे.
- दुसऱ्या प्रसुतीच्या वेळी जर जुळ्या मुली झाल्या, तर या दोन्ही मुली प्रकार दोनचे लाभार्थी प्रमाणे योजनेस पात्र असतील.
- बालगृहातील अनाथ मुलींसाठी योजना लागू आहे
- एखाद्या परिवाराने अनाथ मुली दत्तक घेतले असेल, तर सदर मुलीला त्यांची प्रथम मुलगी मानून या योजनेचा लाभ घेता येईल