PM Awas Yojana Big News Update 2025 : सर्वांना नमस्कार, आपले स्वतःचे घर असावे, असे स्वप्न प्रत्येकाचेच असते. काही लोक असे असतात, जे कुठल्याही मदतीशिवाय आपले घर बांधतात, तर काही लोक असे असतात ज्यांना स्वतःच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सरकार मदत करते.
…अशा लोकांसाठी, केंद्र सरकार पंतप्रधान आवास योजना चालवते, या योजनेंतर्गत सरकार गरजूंना कायमचे घर बांधण्यासाठी आर्थिक मदत करते.

पंतप्रधान आवास योजनेचा लाभ केवळ पात्र लोकांनाच मिळतो. जे लोक या योजनेच्या कक्षेबाहेर येतात, त्यांना या योजनेचा लाभ मिळत नाही. जर आपणही या योजनेचा लाभ घेऊ इच्छित असाल, तर आज आम्ही आपल्याला या योजनेसंदर्भात माहिती देत आहोत.
उत्पन्नाच्या आधारे मिळतो लाभ – केंद्र सरकारने पंतप्रधान आवास योजनेची सुरुवात २०१५ मध्ये केली. याचा लाभ आतापर्यंत लाखो लोकांना घेतला आहे. या योजनेचा लाभ लाभधारकाच्या उत्पन्नावर आधारित आहे. पंतप्रधान आवास योजनंतर्गत वेगवेगळ्या उत्पन्न श्रेणीतील लोकांना वेगवेगळा लाभ मिळतो.
कोण करू शकतं अर्ज – पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत, तीन श्रेणींमध्ये लाभ मिळतो. यात दुर्बल घटक (EWS), निम्न उत्पन्न गट (LIG) आणि मध्यम उत्पन्न गट (MIG) यांचा समावेश आहे. EWS म्हणजे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, यांत ज्यांचे वार्षिक उत्पन्न ३ लाख रुपयांपेक्षा कमी आहे, त्यांना प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ मिळतो.
याच बरोबर, कमी उत्पन्न गट आणि मध्यम उत्पन्न गटातील ज्यांचे वार्षिक उत्पन्न ३ ते ६ लाख रुपये आणि ६ लाख ते १२ लाख रुपये आहे त्यांनाही या योजनेचा लाभ मिळतो.
कुणाला मिळत नाही लाभ? – ज्याच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याच्या नावावर आधीपासूनच पक्के घर असेल, त्यांना पंतप्रधान आवास योजनेचा लाभ मिळत नाही. या शिवाय, ज्याने कुठल्याही सरकारी गृहनिर्माण योजनेचा आधीच लाभ घेतला असले तर, त्यालाही पंतप्रधान आवास योजनेचा लाभ घेता येत नाही.
असा करा अर्ज – आपण या योजनेसाठी पात्र असाल, तर पंतप्रधान आवास योजनेच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकता. किंवाच तुमच्या ग्रामपंचायत कार्यालयात याबद्दल अधिक माहिती मिळून त्यांच्या मार्गदर्शनाखाली अर्ज सादर करून योजनेचा लाभ घ्यावा..,
अधिक माहितीसाठी :- येथे क्लिक करा
PM Awas Yojana Update 20 लाख नवीन घरकुलांचे उद्दिष्ट
प्रत्येकालाच वाटते कि आपल्याला हक्काचे स्वताचे घर असावे. हे स्वप्न आता लवकरच पूर्णत्वास येणार आहे कारण महाराष्ट्र राज्यासाठी नवीन 20 लाख घरकुलांचे उद्दिष्ट मिळालेले आहेत. या सर्व घरकुलांना तत्काळ मंजुरी देण्यात येणार आहे.
बऱ्याच वेळेस होते असे कि लाभार्थीला घरकुल मिळाल्यानंतर निकृष्ठ दर्जाचे काम केले जाते. मात्र यापुढे आता घरकुल योजनेचे काम चांगल्या दर्जाचे झाले आहे किंवा नाही हे पाहण्याच्या सूचना देखील संबधित अधिकारी यांना मंत्री महोदयांनी दिलेल्या आहेत.
घरकुल योजनेत होणारा भ्रष्टाचार थांबविणे गरजेचे
PM Awas Yojana Update काही ठिकाणी अनेकदा घरकुल योजनेच्या अनुदानाचा हफ्ता मिळविण्यासाठी लाभार्थीकडून लाच मागण्याची शक्यता असते. अशावेळी कोणत्याही अधिकारी किंवा कर्मचाऱ्यास पैसे न देता रीतसर तक्रार केल्यास लाभार्थीचे होणारे आर्थिक शोषण थांबू शकते.
तर अशा पद्धतीने ज्या पात्र लाभार्ठींकडे घरबांधकाम करण्यासाठी जागा नाही त्यांना आता प्राधान्याने योजनेचा लाभ दिला जाणार आहे. यामुळे ज्यांना घरकुल बांधकाम करण्यासाठी जागा नाही अशा पात्र लाभार्थीसाठी नक्कीच हि आनंदाची बातमी ठरणार आहे.